ढगांचे प्रकार
कमी उंची वरचे ढग

3. स्तरी कापसी मेघ (Strato-cumulus) Sc
  कापसी मेघ जेव्हा पसरायला लागतात तेव्हा त्यांचे रूपांतर स्तरी कापसी मेघात होते. हे ढग शुष्क, पण कुंद व निरुत्साही वातावरण तयार करतात. कधी कधी हे ढग कापसाच्या लांब गुंडाळ्या एकमेकांना समांतर ठेवल्यासारख्या दिसतात.
 
  उंची (मीटर)  चिन्ह    
  0  ते 2400  
वर कापसी मेघांची वाढ होते तेव्हा    
4. स्तरी मेघ (Stratus) St 
  हे मेघ मुख्यतः थंडीतील ढग आहेत. हे धुक्यासारखे दिसतात किंवा वाटतात, पण हे ढग धुक्यासारखे जमिनीवर स्थिरावत नाहीत. ह्या ढगांमुळे हलका पाऊस पण पडू शकतो. लोणावळा, खंडाळा किंवा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी थंड हवेत जेव्हा ढगांची लाट अंगावर येते, ते ढग स्तरी ढग असतात.
  उंची (मीटर)  चिन्ह    
    2000 पेक्षा कमी  
       
5. वर्षा स्तरी मेघ (Nimbo stratus) Ns,  
  हे ढग पावसाचे असतात व या मुळे सतत पाऊस पडतो. हे ढग मध्यस्तरी मेघापेक्षा खूप जास्त गडद असतात.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  100  ते 2400  
       

[ एकावर एक वाढ होणारे  :::  कमी उंची वरचे  :::  मध्य उंची वरचे  :::  अती उंची वरचे ]