ढगांचे प्रकार
एकावर एक वाढ होणारे ढग

1. कापसी मेघ (Cumulus) Cu
हे ढग आपणा सर्वांच्या खूप परिचयाचे आहेत. हे ढग कॉलीफ्लॉवर किंवा कापसाच्या ढिगांसारखे दिसतात. आपल्याला हे ढग खूप मऊ किंवा गुबगुबीत असतील असे वाटते. वास्तविक मात्र ह्या ढगांत अत्यंत खळबळ चालेली असते. संवहनामुळे ह्या ढगात हवा सारखी खाली वर होत असते. ढगांच्या बाहेर मात्र हवा शांत व प्रसन्न असते. ह्या ढगांना इंग्रजीत फेअर वेदर क्लाऊडस् (fair weather clouds) म्हणतात.
ह्या ढगांचा वरचा भाग पांढरा व खालचा भाग सपाट व काळसर असतो. हे ढग सूर्याला पूर्णपणे आपल्यामागे झाकून टाकतात व ह्या ढगांची सावली पडलेली दिसते.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  500 ते 1000  
यांची वाढ होते तेव्हा 500 ते 2000  
2. कापसी वर्षा मेघ (Cumulonimbus) Cb  
  हे ढग कापसी ढगांच्या पुढची अवस्था असतात. रंगाने ब-यापैकी काळे असलेल्या ह्या ढागांचा आकारही खूप मोठा असतो. हे पाण्याचे ढग असतात. मोकळ्या परीसरात ह्या ढगातून पाऊस पडत आहे असे दिसू शकते.
ह्या ढगात अतितीव्रतेने उथळ-पुथळ होत असते. ह्यांची संख्या वाढून त्याचे वादळात रूपांतर होऊ शकते. वैमानिक ह्या ढगांना खूप घाबरतात व आपापल्या विमानांना ह्या ढगांपासून वाचवून नेतात. हे ढग जास्त उंची गाठल्यावर अडवे पसरू लागतात आणि त्याना चांभाराच्या घणा सारखा आकार येतो.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  2000 ते 12000  
घणा सारखा आकार येतो    

[ एकावर एक वाढ होणारे  :::  कमी उंची वरचे  :::  मध्य उंची वरचे  :::  अती उंची वरचे ]