ढगांचे प्रकार
मध्यम उंचीवरचे ढग

6. मध्य स्तरी मेघ (Alto stratus)  As
  हे ढग एका चादरीसारखे मोठ्या भागात पसरलेले दिसतात. कधी कधी हे पूर्ण आकाश झाकून टाकतात. ह्या ढगांचा थर सर्वत्र समान नसतो. जिथे थर खूप जाड असतो त्या भागातून सूर्यसुद्धा दिसत नाही. या ढगांचा रंग काळपट असतो. विरळ भागातून सूर्याचे अस्तित्व तर जाणवतं, पण आपण सूर्याकडे दुधी काचेतून बघत आहोत असे वाटते. ह्या भागात ढगांना निळसर झाक असते.
हे ढग हवेचा दाब कमी होण्याची शक्यता दर्शवतात.  यांची संख्या वाढली की यांचे रूपांतर वर्षा स्तरी मेघात होते.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  2000  ते 5000  
       
7. मध्य कापसी मेघ (Alto cumulus) Ac, 
  हे ढग पण कापसाच्या गोळ्यासारखे दिसतात. पण हे कापसी ढगांपेक्षा जास्त उंचीवर असतात. जास्त संख्येत हे ढग मेंढीच्या पाठीसारखे दिसतात. हे ढग गडद नसतात व बघायला आकर्षक असतात. सूर्याचा प्रकाश ह्या ढगातून गेल्यावर इंद्रधनुष्यातील रंगांच्या वेगवेगळ्या छटा दिसतात.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  2400  ते 6100  
       

[ एकावर एक वाढ होणारे  :::  कमी उंची वरचे  :::  मध्य उंची वरचे  :::  अती उंची वरचे ]