ढगांचे प्रकार
अतिउंचीवरचे ढग

8. प्रक्षाभ कापसी मेघ (Cirro cumulus - Cc)
  वाळूच्या लाटांसारखे दिसणारे हे ढग क्वचितच बघायला मिळतात. बरेचदा हे ढग वादळ येण्याची पूर्वसुचना देतात.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  6000  ते 12000  
       
9. प्रक्षाभ स्तरी मेघ (Cirro stratus - Cs)
  ह्या ढगात मुख्यतः बर्फाचे पारदर्शक स्फटिक असतात. ह्या ढगांमुळे सूर्याला किंवा चंद्राला कडं पडलेले दिसते. ह्या ढगांची चादर कधी कधी पूर्ण आकाश झाकून टाकते.
  उंची (मीटर)  चिन्ह    
   6000  व त्यापेक्षा जास्त    
       
10. प्रक्षाभ मेघ (Cirrus - Ci )
  उदबत्तीच्या धुरासारखे हे नाजूक ढग आकाशात खूप उंचीवर दिसतात. ह्या ढगांच्या बारीक रेषा बर्फाच्या स्फटिकांनी बनलेल्या असतात. ह्या ढगातून सूर्यकिरणे अगदी आरपार जातात व रात्रीच्या वेळी हे ढग फक्त प्रखर चंद्रप्रकाशातच दिसतात.
  उंची (मीटर)  चिन्ह    
  8000  व त्यापेक्षा जास्त  
       

[ एकावर एक वाढ होणारे  :::  कमी उंची वरचे  :::  मध्य उंची वरचे  :::  अती उंची वरचे ]