ढगांचे प्रकार

व्यवहारिकदृष्ट्या उपयोग होऊ शकेल, असे ढगांचे वर्गीकरण करण्याचा सर्व प्रथम प्रयास लूक हॉवर्ड यांनी १७०३ साली केला. लूक हॉवर्ड इंग्लंडमध्ये रसायन बनवण्याचा व्यवसाय करीत. थोडेफार बदल वगळता त्यांनी केलेल्या वर्गीकरणाचा आज जागतिक स्तरावर वापर होतो. इथे ढगांच्या प्रकारांच्या मूळ इंग्रजी नावांचे "भाषांतर भारत मौसम विज्ञान विभाग" [ India Meteorological Department (IMD)] च्या शब्दावलीतून जसेच्या तसे घेतले आहे. कारण भाषांतराचे मूळ संस्कृत आहे.

ढगांच्या दिसण्या वरून आपण त्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करू शकतो.
१. कापसी ढग - हे नावा प्रमाणे कापसाच्या पुंजक्यासारखे दिसतात.
२. स्तरी ढग - हे ढग चादरी प्रमाणे पसरलेले असतात.
३. प्रक्षाभ ढग - बारीक तंतू किंवा रेषांसारखे हे ढग दिसतात.
सर्वच ढगांमुळे पाऊस पडत नाही.  पावसांच्या ढगांना निंबस म्हणून ओळखतात.

या नंतर ढगांचे वर्गीकरण ते जमीनी पासून किती उंची वर आहेत त्या प्रमाणे करण्यात येतात.  

एकावर एक वाढ होणारे ढग  -    असे ढग ज्याची एकवार एक वाढ होते असे.

कमी उंचीवरचे ढग - हे ढग जमीनी पासून ते १,८०० मीटर उंची पर्यंत जातात. यात प्रामुख्याने पाण्याचे बारीक कण असतात.

मध्य उंचीवरचे ढग - हे ढग १,८०० ते ६,००० मीटर उंची वर असतात. या ढगात पाण्याचे खूप छोटे छोटे कण किंवा बर्फाचे स्फटिक असतात.

अतीउंच वरचे ढग - हे ढग ६,००० मीटर किंवा जास्त उंची वर असतात. यांचा रंग सहसा पांढरा असतो पण यांच्या मध्ये आपल्याला रंगांच्या अनेक छटा दिसू शकतात. विषेशतः सूर्योदयाच्या किवां सूर्यास्ताच्या वेळी.