बोफर्ट स्केल

वायुबल वायुगती
 ताशी कि.मी.
प्रकार परिणाम
0

0 - 1

संथवारा धूर सरळ वर जातो
1 1 -5 हलका वारा धूर वायूच्या दिशेने वाहतो पण, वायू दिशादर्षक  मात्र हलत नाही
2 6 - 11 हलकी झुळूक वायू दिशादर्षक वायूची दिशा दाखवतो, झेंडे फडफडल्यासारखे होतात, झाडाची पान हलतात, वारा अंगावर जाणवतो
3 12 - 19 सौम्य झुळूक पान आणि छोट्या फांद्या सतत हलताना दिसतात
4 20 - 21 मध्यम किंवा मवाळ झुळूक हवेत धूळ उडते. फांद्या वेगाने हलतात.
5 30 - 39 प्रसन्न वारा लहान झाड पण हलायला लागतात
6 40 - 50 तीव्र वारा मोठ्या फांद्या पण हलायला लागतात. उघडलेली छत्री धरण अवघड होतं
7 51 - 61 वादळसम वारा मोठी झाड पण हलू लागतात. चालताना वा-याचा जोर जाणवतो, चालण अवघड होत
8 62 - 74 वादळ झाडाच्या फांद्या तुटायला लागतात. चार चाकी वाहनांना पण याचा प्रभाव जाणवतो
9 75 - 87 जोराचे वादळ वस्तूंना हानी, घरावरची छप्परे (पत्र्यची) उडून जाऊ शकतात
10 88 - 101 तुफान झाडे मुळांपासून उखडून जातात, वस्तूची खूप हानी होते
11 102 - 117 जबर तुफान सर्वनाश, जीवहानी
12 117 + वावटळ मोठ्या प्रमाणात विनाश - जीवहानी

१८०५ साली सर फ्रांन्सिस बोफर्ट यांनी हे स्केल प्रचारात आणले. सर बोफर्ट ब्रिटिश नौदलात ऍडमिरल होते. सन १८३८ मध्ये ब्रिटिश नौदलाने या स्केलमध्ये थोडा बदल करून, ते वापरायला सुरवात केली व मग १८५३ साली ह्या मापचक्राला जागतिक पातळीवर वापरण्यास सुरूवात झाली. वायुच्या वेगामुळे होणा-या परिणामाचे निरीक्षण हा ह्या स्केल आधार आहे. जागतिक स्तरावर ह्या तक्त्याचा उपयोग केला जातो.